स्कुटी
स्कुटी
1 min
309
बरसणा-या पावसात तु
खुणावतेस मला म्हणतेस,
चल मोकळ्या माळरानात
फिरुन आणते मी तुला…
तुझा कोरारंग, नाविन्याचा स्वर
ऐकून मी होतो तुझ्यावर स्वार
देऊन रेसचा स्टार्ट करतो मोकळे
तुझ्या गतीचे पाश…
तु, मी पाहतो माळरानाकडे
वाट मोकळ्या गर्द झाडांकडे…
तुझ्या गतीच्या वेगासोबत
सुरु होतो आपला प्रवास…
गर्द हिरवा निसर्ग, बेभान वारा
पावसाच्या धारा, वेगवान शहारा..
तु म्हणतेस , जरा जपून राजा
घे ब्रेकचा सहारा…
घेऊन मोकळा श्वास
आठवून भेटीची आस…
तुझ्या वेगवान स्वारीने मी,
गाठतो माळरानं क्षणार्धात..
फिरवून तुझ्यावर मायेचा हात
मी डोळे भरुन पाहतो
माझ्या प्रेयसीची वाट..
