STORYMIRROR

Nilesh Bamne

Others

4  

Nilesh Bamne

Others

सिगारेटच्या धुरात...

सिगारेटच्या धुरात...

1 min
363

लांबून पाहिले तिला

फारच आकर्षक दिसत होती

म्हटलं सौंदर्य जवळून पाहावं

म्हणून तिच्या समोर गेलो

तर तिचा चेहराच दिसत नव्हता

तो झोकाळला होता

ती फुकत असणाऱ्या

सिगारेटच्या धुरात...

क्षणभर मी स्तब्ध झालो

स्वतःशीच म्हणालो

आज आहे ही सूंदर

पण भविष्यात...नसेल 

कदाचित ही इतकी सुंदर...

सुशिक्षितही होती, सुंदरही होती, 

सुसंस्कृतही असेल पण ...?

एक चांगली आई...

नाही होऊ शकणार...कदाचित

सिगारेट फुकणारी व्यक्ती

स्वतःसोबत इतरांच्याही

जीवाला धोका निर्माण करते

तिच्याही नकळत...

वाटले होते तिला म्हणावे

सिगारेट ओढू नकोस ? 

पण खात्री होती...अनुभवाने

ती माझा बापच काढेल...

यापूर्वी तिच्या ज्या सौंदर्याने

मला भुरळ घातली होती

तिचे ते सौंदर्य 

आता माझ्या नजरेत

कवडीमोल झाले होते...

खरं म्हणजे तीच

आता सिगारेटचा धूर झाली होती

इतरांना नको नकोसा वाटणारा...


Rate this content
Log in