श्वास तिच्यासंगे!
श्वास तिच्यासंगे!
1 min
29
तुझ्या येण्याची चाहूल तिला लागली, दो
न श्वासासंगे ती रात्रभर जागली!
खोल श्वासाने तू रे... हंबरडा फोडला,
तुझ्याच रडण्याने तिने निःश्वास सोडला!
एकाच रक्ताची ना कधी तीही मानलेली,
तिचं बहीण त्याने श्वासानेच जाणलेली!
तिच्याच अस्तित्वाचा अंश मनी वसतो,
ताई पुढे अजूनही मी लहानच दिसतो!
कर्तृत्वाच्या पंखास तिचाच आधार मिळतो,
तिच्याच साथीने मी त्या ध्येयाशी बोलतो!
श्वासातला श्वास जरी वेगळाच असेन,
संकटाच्या वेदनेत तिचाच सहभाग दिसेन!
जगण्यातला विवेक मनाशी साधेल,
साध्यापणातला डौल कृतीतून बोलेल!
त्याच पतंगाची नाळ मातीशीच असेन,
नाते ते आपुले मानवतेशी सहज खुलेन!
कोंडलेल्या श्वासाला तुझ्यापाशी मोकळीक हवी,
शेवटच्याही श्वासासंगे नको ती कुस ती नवी!!!