STORYMIRROR

Rahul Pisal

Others

3  

Rahul Pisal

Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
82

बीज रोवली मातीत,

त्यास मातीचा ही गंध,

ओढ त्या पावसाची,

बीज अंकुरण्याचा छंद!


मातीत तो लोळला,

कष्टकरांचा तो नांगर,

आज राबराबतो शेतात,

उद्याची मिळाया भाकर!


त्याच्या येण्याची वाट मी,

तिच्या भेटीसारखी पाहिली,

भावनांचे ढग मनी दाटताना,

ओढ मनी अजूनी तशीच राहिली!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन