STORYMIRROR

Madhuri Amrutkar

Others

4  

Madhuri Amrutkar

Others

शूर अहिल्या

शूर अहिल्या

1 min
347

शब्द पालवी सखी मंच आणि स्टोरी मिरर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रम काव्य लेखन


छोट्याश्या चोंढी गावात 

माणकोजी शिंदेच्या पोटी 

जन्मले असे कन्यारत्न  

सुशीला मातेच्या ओटी 1


बहुगूणी अहिल्या बाई 

शंकराला सदा स्मरणारी 

शिवलिंगाचे करूनी रक्षण 

घोडदौडीला ना घाबरी 2


सासरे मल्हाररावांनी 

ओळखली वीर मर्दानी 

सून पेशव्यांची होऊनी 

झाली खंडेरावंची पत्नी 3


आदर्श सुन, कुशाग्र बुद्धी 

पण निधन पावले पतिराज 

सति जाण्यास ती निघाली 

परावृत्त केले सासर्यांनी 4


सांभाळून ईंदौरचा कारभार  

कुट नितीला केले हद्दपार 

ठणकावून दिले ऊत्तर 

मग घेतली त्यांनी माघार 5


औदार्य, दानधर्म, धार्मिकता 

असे सर्व गुणसंपन्न 

जिर्णोद्धार केला मंदिरांचा 

नदिघाट बांधले भारतभर 6 


लोकांच्या ह्रदयसिंहासनावर

कौतुकास्पद केले अधिराज्य

शांतता , सुव्यवस्था राखून 

मालवली 70 व्या वर्षी प्राणज्योत 7


कोटी कोटी वंदना 

देवी अहिल्या मातेला 

महान कार्य केले जगी 

अजरामर ह्या संध्येला 8


साहित्याला गुण द्या
लॉग इन