श्रावणसरी
श्रावणसरी
1 min
119
इंद्रधनुष्याचे तोरण।
साज नवा ल्याला श्रावण।।ओओओहो।।
आला श्रावण श्रावण धरती ल्याली नवं लेणं।
काळ्या मातीतून फुटे बीजाबीजाला जिवन।
उनपावसाचा खेळ इंद्रधनुची कमान।
नव्या रंगांची ही उधळण।।
साज नवा ल्याला श्रावण।।ओओओहो।।
धरा मोहरून जाई रिमझीम पावसानं।
पंचमीला नाग पुजा सुरू होती नवे सण।
सोमवारी शंकराला बेला फुलाचे पुजन।
दंडवत हात जोडून।।
साज नवा ल्याला श्रावण।।ओओओहो।।
श्रावणाच्या पुनवेला भाऊ बहिणीचा प्राण।
राखी बांधून मागते रक्षणाचं हे वचन।
कोळी सागरात जाई त्याला नारळ अर्पुन।
सुरु करी काम जोमानं ।।
साज नवा ल्याला श्रावण।।ओओओहो।
