घन ओथंबून आला
घन ओथंबून आला
1 min
173
आला सोसाट्याचा वारा त्यात काळोख दाटला।
ढग गर्दी करी नभी घन ओथंबून आला।।
कडाडून आकाशात सौदामिनी गरजते।
लख्ख प्रकाश पडतो घर काळजा पडते।
कोसळतो तो बेभान बांध नदीचा फुटला।।१।।
काय सांगू त्याची गोष्ट त्याला काहीच कळेना।
वाट पाही धरती पुत्र वेळेवर तो येईना।
दृष्ट काढाया तुझी ही पाच सवाष्णीही आल्या।।२।।
थांब जरा मेघराजा आता खुप वर्षा झाली।
शेतक-याची मेहनत आज मातीमोल केली।
आला नाही आणि जरी आला त्रास होतो सगळ्याला।।३।।
