आला पाऊस
आला पाऊस
1 min
60
मेघ आले दाटून अन् काळोख झाला गगनी।
पावसाच्या जाणिवेने पुलकित झाली धरणी।।
निळे निळे आकाश झाकोळले काळ्या ढगांनी।
चालू झाले संगीत त्यांचे विज गेली चमकूनी।
सरसर सरसर पडू लागला वाहती वळचणी।।१।।
ऐकुन आला वेळेवर तो शेतक-याची विनवणी।
खुशीत मग शेतक-याने सुरू केली नांगरणी।
वाहतात झरे, ओढे मंजुळ गीत येते कानी।।२।।
धरा झाली हिरवीगार नवाकोरा शालू नेसूनी।
थेंब नाचती थय थय आज माझ्या या अंगणी।
असा हा पाऊस साऱ्या जगास देई पाणी।।३।।
