आला पाऊस पाऊस
आला पाऊस पाऊस
1 min
75
आला पाऊस पाऊस, येतो मातीला सुवास।
नाचे मोर खुशीमध्ये, उघडून पिसा-यास।।
विज लकाकून जाई, आसमंत उजळून।
ढोल वाजतो ढगांचा, सारे जाती घाबरून।
चिंब झाले पशु-पक्षी, जाती आपुल्या घरास।।१।।
इंद्रधनुष्याचे तोरण, वर आकाशात सजे।
निर्झरांची खळखळ, जणू संगीतच वाजे।
हिरवळ दाटे चहूकडे, नवे रूपडे धरेस।।२।।
वृक्ष वेली बहरती, हिरवं लेवून हे लेणं।
पाना फुलातुनी दिसे, जसे सुंदर लावण्य।
मन होई रे प्रसन्न, बघून सारी ही आरास।।३।।
