STORYMIRROR

Vishal Marathe

Others

3  

Vishal Marathe

Others

श्रावण महिना

श्रावण महिना

1 min
104

रिमझिम करती श्रावण धारा 

गुण गुण गातो मंद वारा

झुळझुळ वाहतो स्वछ होऊनी सुंदर निर्मळ झरा ।।धृ।।


धरती माता नटून गेली हिरवी शाल घेउनी 

शेत शिवारे बहरून जाती आनंदे डोलूनी

ऊन पाऊस श्रावण मासी लपंडाव खेळती 

बालपणीच्या आठवणीही, नव्याने उजळती ।।१।।


नागपंचमी नारळी पौर्णिमा सण येई रक्षाबंधन 

सोन्याचा नारळ ही करती दर्याला त्या अर्पण 

व्रतवैकल्ये पूजा अर्चना ही श्रावणाची महती 

मन शांतता मिळूनी निराशा सर्वही उडून जाई ।।२।।


फुलवून पिसारा मोर नाचतो थुईथुई रानात 

हर्ष दाटते प्रसन्न होई मन श्रावण महिन्यात.

निसर्गरम्य परिपूर्ण अशी श्रावणाची किमया

ओढ घेई मन नकळत कधी गीत श्रावणाचे गाया।।३।।


Rate this content
Log in