STORYMIRROR

Tejal Dalvi

Others

4  

Tejal Dalvi

Others

शोध

शोध

1 min
486

सरकणारे काटे आणि पळणारे अस्तित्व

अनोळखी वाट आणि उलगडणारे स्वत्व

शोध नक्की कशाचा?

स्वातंञ्याचा की चौकटीतल्या सुखाचा?

राहून राहून इथेच सगळं अडतंय...

मन माञ फक्त कुठेतरी विसावा शोधतंय...


गर्दीत हरवलेले असंख्य चेहरे 

काही धीट तर काही अजाण बावरे

या गर्दीत शोध नक्की कशाचा?

समाधानाचा की ऐहिक सुखाचा?

निरुत्तर प्रश्नाने सारं थबकलंय...

मन माञ फक्त कुठेतरी विसावा शोधतंय...


कधीकधी एक आर्त साद येते आतुन

हे स्वप्नंच नव्हतं तुझं जाते सांगुन...

मग हा शोध नक्की कशाचा?

जुन्या आकांक्षांचा की नव्या क्षितिजांचा 

सारंच अंधुक अनाकलनीय होतंय

मन माञ फक्त कुठेतरी विसावा शोधतंय...


वास्तवापल्याड हवीशी एक पारखी दिशा

गवसण्या ती मुक निर्धाराची भाषा

शोध नक्की कशाचा?

त्या लपलेल्या दिशेचा की वास्तवातल्या परिघाचा

आताशा ते परिघही हळूहळू विस्तारतंय

मन माञ फक्त कुठेतरी विसावा शोधतंय...


सुख दुःखाचे रोज नवे बहाणे

निखळ हास्याचे विसरलेले तराणे

शोध नक्की कशाचा?

आनंदी जगण्याचा की क्षणिक उपभोगाचा?

शर्यतीत जिंकण्याच्या त्वेषात सारं जग धडपडतंय

मन माञ प्रत्येकाचं झगडतंय, आपल्यांपाशी घुटमळतंय

कारण

ते बिचारं फक्त कुठेतरी विसावा शोधतंय...


Rate this content
Log in