STORYMIRROR

Tejal Dalvi

Others

3  

Tejal Dalvi

Others

काहीसं राहून गेलेलं...

काहीसं राहून गेलेलं...

1 min
327

आज कागद मुका झाला,

शब्द रुसलेत असं वाटलं...

नवीन विषयाच्या शोधात

मनातलं कागदावर उतरवायचं राहुनच गेलं...!


त्याच कागदाची नाव बनवली,

खिडकीकडे सहजच एक नजर टाकली

बाहेर दाटलेला आठवणीतला पाऊस अन् पावसातल्या आठवणी,

पण ती नाव त्या पावसात सोडणं मात्र राहुनच गेलं...!


पाऊस ओसरला,मळभ दूर झालं

बाहेर पडायचं मी एक निमित्त शोधलं

असं फिरायला आवडतं मला... गर्दीत..

पण गर्दीतल्या विचारात किंवा विचारांच्या गर्दीत...

कोणापाशीतरी उत्कटपणे व्यक्त होणं राहुनच गेलं...!


बसुन घेतलं मग आडोशाला

स्वतःत डोकवायचा वेडा प्रयत्न केला...

अनामिक भीती की ओढ वाटली कसलीशी?

निरुत्तर प्रश्न सगळेच....

सोडवण्याचा अट्टहासही शून्यच

मग जाणवलं,

स्वतःशी मैत्री करणं राहुनच गेलं...!


Rate this content
Log in