STORYMIRROR

Tejal Dalvi

Others

4  

Tejal Dalvi

Others

मृगजळ

मृगजळ

1 min
1.4K

अलगद वाऱ्याची मंद झुळूक आली,

आणि नकळत ती शहारुन गेली


अगतिकपणे, कोवळ्या उन्हात

स्वतःच्याच सावलीला निरखत


तो भेटतो तिला रोज असाच

कधी वाऱ्यात, कधी मंद प्रकाशात

कधी पावसात,तर कधी तिच्याच सावलीत


बोलत मात्र काहीच नाही

नुसताच मूकसंवाद...

नुसतीच जाणीव तो असल्याची...


ती गोंधळलीये, थकलीये, आक्रोशतीये

हा अबोला तोडण्याचा वेडा प्रयत्न करतीये


दाटून आलेल्या हुंदक्याला तिने परत पाठवलंय,

'तो आहे इथेच' असं मनाला हजारदा बजावलंय


स्वतःचीच समजुत काढताना हल्ली तिच हरते!

पण तितक्यातच पावसाची एक सर येते, अन् ती पुन्हा तोच खेळ रंगवते


तिचं सबंध आयुष्य एका मृगजळाभोवती रेंगाळतंय,

वास्तव मात्र ढगाआड लपुन तिची मनापासुन माफी मागतंय..


Rate this content
Log in