शिवाजी महाराज....
शिवाजी महाराज....
1 min
225
जन्मला जिजाऊ पोटी
तेजस्वी सूर्य हो एक
रयतेच्या उद्धारासाठी
शिवबाचे तेज अलौकिक
तलवारीच्या पात्याने
छाटल्या शत्रुंच्या माना
शिवरायांच्या पराक्रमाने
ताठ झाल्या झुकलेल्या माना
रवीचे तेज, भवानीचा आशीर्वाद
लाखमोलाचे मावळे, केले शत्रुंना बरबाद
असा शिवाजी राजा आजही अजरामर
करुनि वंदना करिते राजेंचा जयजयकार...
