शेतकरी दादा..
शेतकरी दादा..
1 min
466
शेतकरी दादा नको लावू गळा फास
मुलाबाळांची, कुटुंबांची साऱ्या तूच असे आस
फास लावुनिया सुटेल का कोडं
तुझ्याविना संसार होईल का धड
नाही पाऊस पडत, कधी शेत वाहुनिया जातं
तवा मन तुझं रडतं, कधी पीक करपून जातं
कर्जाचा डोंगर होईल संसार रेटताना
नाही फिटलं कर्ज, तर जवळ करितोस मरणाला
नको राजा मरू, कर शेतीसवे जोडधंदा काही
मरण्याने प्रश्न कधी सुटायचा नाही
पोरके होतील लेकरे, होईल पोरकं घरदार
शेतकरी दादा नको लावू गळा फास, कर
कुटुंबांचा रे विचार, कर कुटुंबाचा विचार...
