सब चलता है...
सब चलता है...
नीरर्थक गोष्टींची पार्टी करतोय
बीअर, व्हिस्की, ब्रीज़र घरीच पितोय
छोट्यांना पण थोडा चकणा देतोय
सब चलता है, आम्ही mature झालोय!
अल्पवयात मुलांना हाई एन्ड गाड़ी देतोय
वरुन ती गाड़ी स्वतः शिकवतोय
त्यात आम्हाला फार मोठेपणां वाटतोय
सब चलता है, आम्ही responsible झालोय!
ट्रेन च्या दरवाज्यात whatsapp चाळतोय
माणुसकीचे मेसेज सगळ्यांना पाठवतोय
आणि प्लेटफॉर्म वाल्यांना मात्र हड़तुड़ करतोय
सब चलता है, आम्ही social झालोय!
बेटर इंडिया साठी रोज ब्लॉग्गिंग करतोय
पण रेशन कार्ड च काम निघाल्
तेव्हा मात्र बाजूच्या ऐजेंट कड़े धावतोय
सब चलता है, आम्ही conscious झालोय !
पैसा, मौज मस्तीसाठी अहोरात्र जागतोय
धार्मिक दिवशी मात्र अंथरूणात ताणतोय
नकळत विभत्सपणे आपलीे संस्कृती गाड़तोय
सब चलता है, आम्ही modern झालोय!
अरें खुप झाल्,
"चलता है - चलता है" काय लावलय हं?
हे असल् आम्ही फार ऐकलय
आम्ही तेच करणार जे आम्हाला वाटतंय
कारण, .......!
