इलेक्शन
इलेक्शन
1 min
13.6K
इलेक्शन ची तारीख आली जवळ,
अहो सगळ्यांची झाली फार धावपळ
विकासाच्या नावाखाली FSI वाढलाय,
दिवे वाढलेत, मेगावॉट तितकाच रहिलाय
पाण्याचे आकडे लावा मोठ्या बोर्ड्सवर,
अहो पण लोकं वाट बघतात नळावर
चांगल्या रोड ला उगाच्चा नविन मुलामा,
अहो जरा गटराची झाकण तर सुधारा
कार्यकर्त्यांना वाटतंय आम्ही मोठे लधवय्ये,
अहो त्यात अर्धे आहेत फक़्त खवय्ये
प्रत्यकाला वाटतंय माझच पक्ष मोठा,
अहो होना,
कारण मतदराचा रोल झालाय फारच छोटा
पिवळा भगवा निळ्या रंग सगळीकडे दिसतोय,
मतदार मात्र उज्वल इंद्रधनुष्य शोधतोय.
