" सावरुनी घे तू "
" सावरुनी घे तू "
1 min
28K
सावरुनी घे तू ,
तुझा तोल आता ...
आता सावराया ,
कुणा वेळ नाही .
तुझ्या आसवांचे ,
कधी झाले मोती ...
आज कुणा त्याचे ,
मोल इथे नाही .
घाव जे जिव्हारी ,
झेलले कधी तू
तमा आज त्याची ,
कुणा इथे नाही .
सभोती जरी ही ,
गर्दी माणसांची ...
तुझ्या स्पंदनांना ,
रेंज इथे नाही .
सुविधात सारी ,
सुखे शोधताना ...
ह्रदयात आता ,
ओल बाकी नाही .
कशाला कुणाशी ,
मतभेद आता ...
पूर्वीचा तो जोश ,
तुझ्यामध्ये नाही .
