STORYMIRROR

Hrishikesh Vijay Bhagwat

Others Tragedy

5.0  

Hrishikesh Vijay Bhagwat

Others Tragedy

सावरकर

सावरकर

1 min
14.5K


स्वातंत्र्यवीर, आम्हा माफ करा,

न ठेवली आम्ही तुमची शान.

कष्ट भोगले तुम्ही देशासाठी,

पण तुम्हाला सततचाच अपमान.


स्वातंत्र्याच्या नंतरही तुमची,

होती विरोधकांना भीती.

कट कारस्थाना मधले दोषी,

ठरवले, वार सहावे तरी किती.


मातृभुमीच्या प्रेमासाठी भोगली,

शिक्षा काळ्या पाण्याची.

त्याचं सोयर सुतक ना कोणा,

चलती फक्त बापुवाल्यांची.


सर्व समाजांना एकत्र आणण्याचा,

तुम्हीही उचलला विडा.

एकाच समाजापुरते मर्यादीत ठेवून,

वाढवली तुमची पीडा.


आजही उठते कधी, तुम्हाला,

भारतरत्न द्यायची मागणी.

जीव होतो कासावीस,

अन मनाची होते फाळणी.


कधी वाटते मिळावे,

कार्य तुमचे जगासमोर येणार.

पण दुसऱ्या क्षणी वाटते,

हा अन्याय तर नाही होणार.


Rate this content
Log in

More marathi poem from Hrishikesh Vijay Bhagwat