सावित्री
सावित्री


स्त्रीयांच्या तु जीवनी
पेटवली ज्ञान ज्योती
सावित्री आमची माता
मावळले चंद्र किती....॥१॥
झटली तु ज्ञानासाठी
झेलुनी तु दगडमाती
जोतिबाची तु सावित्री
मावळले चंद्र किती....॥२॥
जगाची हीच धरणा
चुलमुल स्त्री जीवना
अक्षर फुले वेचती
मावळले चंद्र किती.....॥३॥
जाळळीस तुच काया
ना धरला मोह माया
सावित्री जगतज्योती
मावळले चंद्र किती....॥४॥