STORYMIRROR

शिवानंद रत्नपारखे

Others

3  

शिवानंद रत्नपारखे

Others

क्षणभर भेट व्हावी

क्षणभर भेट व्हावी

1 min
189

कधी येणार तू बाळा

आस लागली पाहण्या, 

वाट पाहती रे माय

ओल्या झाल्या रे पापण्या... 


सेवा करण्या देशाची

गेला सीमेवर बाळ, 

कधी येशील परत

खूप लोटला रे काळ... 


क्षणभर भेट व्हावी

हिचं इच्छा आहे मणी, 

जीव जाण्याच्या आधी तु

पजशिल का रे पाणी...


थांब थांब यमराजा

आता नको मला नेऊ, 

येऊ दे लेकास त्याला

डोळा भरून दे पाहू...


Rate this content
Log in

More marathi poem from शिवानंद रत्नपारखे