सांजवेळ
सांजवेळ
1 min
41.2K
नभात लाली
पसरली पृथ्वीवरती
आनंदी होई धरती
. ....... या सांजवेळी
पक्षी ही परतती
आपल्या वस्ती
माय त्यांची
गालात हासती
........... या सांजवेळी
ओढ ही पिल्यांची
धावत नेई घराशी
पायवाट तुडवित जाई
आपल्या चिमुकल्यापाशी
.......... या सांजवेळी
येता जवळी घराशी
पिल्लेही बिलगती उराशी
स्मितहास्य उमटते ओठाशी
. ....... या सांजवेळी
