अनिता मुरकुटे

Others


4  

अनिता मुरकुटे

Others


माझे अंगण

माझे अंगण

1 min 305 1 min 305

माझिया रे अंगणात

रंगोली राणीचा थाट

पारिजातकाचा सडा

मांगल्याची पायवाट॥१॥


माझिया रे अंगणात 

राम तुळस डोलते

मंजिरीनी बहरते

जशी नवरी सजते ॥ 2॥


माझिया रे अंगणात

मोगरा बाई फुलला

त्याचा ग सारा सुगंध

चोहिकडे पसरला ॥ 3॥


माझिया रे अंगणात

भास्कर डोकावतो

सुमनासवे गृहास

खुदकन हसवतो ॥४॥


माझेच अंगण माझ्या

सुखदुःखा भागीदार

थकल्या भागल्या जीवा

त्याचा वाटतो आधार ॥५ ॥


Rate this content
Log in

More marathi poem from अनिता मुरकुटे