*रुणानुबंध*
*रुणानुबंध*
तुझं माझ्या जवळ असून ही
ऋणानुबंधत राहायचे राहून गेले.
कशी भेट ती रस्त्यावरी ज्यात तुझ्याशी बोलायचं राहून गेले
तुला अबोला पाहून नयनी अश्रूंच्या धारा
गर्जीत भावनांचे मेघ ही बरसायचे राहून गेले
कसे हे हृदयी जपलेले ऋणानुबंध मनात असतांना देखील
समाजापुढे आणायचे राहून गेले
कशी भेट ती रस्त्यावरी ज्यात तुझ्याशी बोलायचे राहून गेले
हसून वेदना झाकतांना तुझे ते पाठी वळून पहायचे राहून गेले
कशी भेट ती रस्त्यावरी ज्यात तुझ्याशी बोलायचे राहून गेले
तू नसतांना बेभान वाऱ्याला किती तरी प्रश्न मी केले.
तू लक्ष्य असून उत्तरे मनातच कैद केले
कशी भेट ऋणानुबंधाची जे बंध मांडायचे राहून गेले
मी तुझ्या साठी गायले जे गीत ते तुझ्या कर्णपटला
पोहचण्या आधीच वाऱ्यावर राहून गेले
कशी भेट ती रस्त्यावरी ज्यात तुझ्याशी बोलायचे राहून गेले.
आता चालतो ज्या मी ओसान वाटा ज्यावर तुझे मात्र पावलांचे ठसे मात्र राहून गेले
कशी भेट ती ऋणानुबंधाची जे बंध चिरकाल स्मरणातच मात्र राहून गेले.