रुद्र.....
रुद्र.....
1 min
292
रुद्र रुद्र जय जय शिवहार
विषपान केले तुम्ही श्रुष्टि रक्षिण्या शिवशंकर
नीलकंठ झाला, दाह किती सोसिला
रक्षण करण्या सजीवांचे, विषाचा प्याला पचविला
नटराज तांडव तुमचे पाहून
अवघी श्रुष्टि गेली दंगून
रुद्राक्षाच्या वृक्षात तुमचे अश्रू
शिवशंकर तुम्ही देव स्वयंभू
भाळी भस्म शोभते, नंदीचे वाहन असे
सखी पार्वती , पुत्र गणपती कार्तिकेय शोभतसे
बिल्वपत्र बहुप्रीय तुम्हाला
गंगाजल आवडते अभिषेक करायला.
