ऋतुराज - पावसाळा
ऋतुराज - पावसाळा

1 min

65
नभातूनी कोसळती या धारा,जशी कोसळे गंगा मस्तकी शिवाच्या |
संपवुनी चकोराची प्रतिक्षा,प्रगटे हा वरुण राजा ||१||
नभासही वाटे मोकळे,शिंपडुनी अमृत सारे |
सर्वत्र सुंदर साजिरे गोजिरे,अंथरले हिरवे गालीचे जसे ||२||
रंगिबेरंगी फुलांची बहार,जणु वाटे कुशल ऐसे नक्षीकाम |
थंड गार हवेतील तो बहार,आठवी रमणीय स्मृती छान ||३||
भागवुनी तृष्णा वसुंधरेची,वरुण तो तृप्त होइ मनोमनी |
भेटीची ओढ होती या हृदयी,आज ते अवचित्य साध्य होइ ||४||
आता गमनाची वेळ झाली,विरहाचे प्रारब्ध पुन्हा येई |
सोडुनी विरहाची छाप आपुली,इंद्रधनुष्य प्रगटे या नभी ||५||