रोजचेच आहे..
रोजचेच आहे..
1 min
186
काय सांगू तुला
दुःख माझे देवा
गाऱ्हाणे माझे हे रोजचेच आहे..
दुःख माझे मला
रोजचं छळे
मन माझं मनातल्या मनात
हे रोजचं रडे..
सांगू कुणा माझ्या
ह्या मनाच्या व्यथा
गाऱ्हाणे माझे हे
रोजचेच आहे..
नको नको म्हणता
आज नाही काल नाही
तर दुःख हे माझे अजन्माचे आहे
गाऱ्हाणे माझे हे रोजचेच आहे..
देवा पुढे दिवा मी
रोजच लावे
पण का मागू तुला
थोडं सुख रे देवा
गाऱ्हाणे माझे हे रोजचेच आहे..
काय सांगू तुला
दुःख माझे देवा
गाऱ्हाणे माझे हे रोजचेच आहे....
