रक्षाबंधन
रक्षाबंधन


कृष्णाने बोट कापून काम ठेवले वाढूनl
भरजरी शालू द्रौपदीने दिला फाडूनl
द्रौपदीचा बंधू शोभे राधारमणl
कौरव सभेत द्रौपदीचे होता चिरहरणl
वस्त्र पुरवून कृष्णाने तिचे हरले मरणl
भावासाठी बहीण म्हणजे आन बाण शानl
या नात्यात नाही मान अपमानl
कर्मावतीने हुमायूनला पाठवली राखीl
कर्मावती बनली हुमायूनची सखीl
अहिल्यादेवीने राघोबाला बनवले भाऊl
राज्य न जिंकताच त्याने दिले तिला जाऊl
भाऊ-बहीण नात्याचे थोरपणl
आनंदाने भरलेले बालपणl
बहीण-भाऊ नाते चिरंतनl
या नात्याला नाही कशाचे बंधनl
मोठी बहीण भावाची शिक्षिका आणि आईl
लहान बहीण भावाची सर्व रहस्ये पोटात घेईl
भावासाठी बहीण सर्व ज
गाशी घेते पंगाl
बहिणीसाठी भाऊ करतो राडा व दंगाl
बहिणीशिवाय भावाचे कोणतेच कार्य होत नाही पुरेl
भावाला बहीण म्हणजे माहेर दुसरेl
या नात्याचे देवालाही स्वप्न पडले?
म्हणूनच भाऊ-बहीण हे नाते घडलेl
बहिणीसाठी रावणाने घडवले रामायणl
बहिणीसाठी त्याने केले सर्व समर्पणl
बहिणीची मुले भावासाठी जीव की प्राणl
भाचवंडासाठी तो स्वतःलापण ठेवील गहाणl
आईपेक्षा मुलांना मामा असतो लाडकाl
तोच वाचवतो जेव्हा आईचा उडतो भडकाl
भाऊ बहिणीचा श्वासl
बहीण भावाचा विश्वासl
सर्व संकटात भाऊ असतो पाठीl
तोच तिच्या आधाराची काठीl
पाऊस नाही पाणी नाही लव कशाने गळतेl
भावाचे दुबळेपण बहीण मनात जळतेl