STORYMIRROR

Vimal Tambe

Others

3  

Vimal Tambe

Others

खरं सांगा

खरं सांगा

1 min
11.8K

जेव्हा माझे मन भरून येते

तेव्हा मी कविता लिहायला घेते

शब्दांत बरोबर मीही रिती होत जाते


सकाळची गडबड कामावर जायची लगबग

ट्रेनची गर्दी आणि धावपळ

खरं सांगा मिस करताय ना?


सकाळ संध्याकाळ भरून वाहणारे रस्ते

ऑफिसातील मस्ती आणि मजेदार किस्से

खरं सांगा मिस करताय ना?


विकेंडची सुट्टी आणि बाहेरची निर्मळ हवा

हॉटेलचं जेवण आणि स्विमिंग पूलचा गारवा

हवाहवासा रविवार नकोसा सोमवार

खरे सांगा मिस करताय ना?


मुलांची उन्हाळी सुट्टी आंब्याचा स्वाद

भरलेल्या बागा आणि मैदानावरील ओरडा

मामाचे गाव मामीचा जिव्हाळा

आजी-आजोबांचे प्रेम सर्व भावंडांचा मेळा

खरे सांगा मिस करताय ना?


मित्र व सहकाऱ्यांच्या गप्पा

नवीन माहिती आणि रिकामा कप्पा

घरात कोंडणे आणि एकत्र राहण्याचा मोका

रेल्वेतील भेंड्या आणि पत्त्यांचा खेळ

सर्वांसोबत मजेत घालवलेला वेळ 

लंच टाईम आणि चहाची वेळ

खरं सांगा मिस करताय ना?


गावातील जत्रा सण समारंभ

लगीनसराई आणि नातेवाईकांच्या भेटी

नवीन कपडे दागिने आणि प्रेमाची मिठाई

सर्वांचे अगत्य आणि आहेर

विश्रांतीसाठी दोन दिवसाचे माहेर

खरे सांगा मिस करताय ना?


Rate this content
Log in