STORYMIRROR

CHINTAMANI PAWASE

Others

3  

CHINTAMANI PAWASE

Others

राष्ट्रभक्ती

राष्ट्रभक्ती

1 min
231

पुन्हा एकदा वंदे मातरम निर्घोष

आसमंतात दुमदमू दे

हॄदयातील भगतसिंगाला 

मज जागवू दे


रक्तरंजित झाले तयांना

क्षणोक्षणी आठवू दे

फ़ासावरही चढले तयांचे

अश्रू मज पुसू दे


स्वातंत्र्य विजयाची ज्योत

अंतरी पेटत राहू दे

अभिमानाने-गौरवाने

तिरंगा विश्वात लहरू दे


रक्षण्या काळ्या आईस

दुश्मनाचे घाव मज सोसू दे

भारतभूचि कुस 

माझ्या रक्तानं धन्य होवू दे


फौलादी छाती करणाऱ्या विरास

मज सलाम करू दे

पुन्हा एकदा वंदे मातरम निर्घोष

आसमंतात दुमदमू दे



Rate this content
Log in