बाबा
बाबा
अरे भाऊ, चल आज बापाला समजून घेवू
तो जीवंत आहे तोवर, त्याच्या अंगा-खांद्यावर खेळून घेवू....
ज्याने तुझ्यासाठी सर केला
अश्रुन्चा पाट आणि दुःखाचा सागर
अन तुझ्यासाठी जपून ठेवला जगण्यासाठी वावर
म्हातारा झाला म्हणून काय झालं, त्याला आता तू सावर...
ठेच तुला लागली असता दुःख त्याला व्हायचं
हंबरून नाही पण काळीज खूप रडायचं
लहान होतास तेव्हा, अंगा- खांद्यावर खेळायचास
कपडे त्याचे माखवायचास
पण कधी एका शब्दाने बोलला नाही तुला
आज त्याची तू काठी हो मूला...
आठव त्याचा स्वाभिमानी बाणा
काळजात लपविल्या कितीतरी संवेदना
अश्रुही लपविले कित्येक क्षणा
पण मोडला नाही कणा...
संसाराचा गाढा ओढताना राब-राब राबला
उन्हां-तानामधे घामाने भिजला
रात्रंदिस तुझ्यासाठी अनवाणीच फिरला
चिमटा काढून पोटाला तुझ्यासाठीच झिजला...
त्यालाच तू विठ्ठल-अल्लाह-येशू समज
अन तू पुंडलिक-पैगम्बर-पादरी हो
अहंकार, धन-दौलत फ़िके त्याच्यासमोर
सेवा करण्यास त्याची तू जेरबंद हो...
