राखेतले शब्द
राखेतले शब्द

1 min

11.5K
सरलेल्या उन्हाची सांज
जरा थकलेली होती
कुठे किरणांची मोळी
वाऱ्यावर भिरभिरत होती.
उष्ण गाणे तुझे ओठी
मनातल्या सावलीत बोचे
कुधी गारव्याच्या छटा
माझ्या अंतरात पोचे.
तुझी कातर ती संध्या
शब्द उरात जळाले
राखेवरची ती भ्रांत
शब्द पाखडून पाहे.
त्या राखेच्या त्या ओळी
चंद्र पाहत रेखला
मग सावली मनात
एक झुळूक नभाला.
दिली शीतल ती गाथा
शब्द राखेतले जागे
किरणांची मोळी तुटून
चंद्र मोळीत विराजे