एक क्षण त्या ढगांचा
एक क्षण त्या ढगांचा
1 min
27.5K
एक क्षण त्या ढगांचा
त्यातून टपटपणाऱ्या थेंबांचा
थेंबासवे सरींच्या बरसण्याचा
डबक्यात मी स्वतः स न्याहाळण्याचा.
पानांचा हिरवा रंग फुलांत उठून दिसण्याचा
मातीच्या गंधात हरपून जाण्याचा
मनातले धुंद वारे गंधित करण्याचा
पिकातल्या सोन्यावर अधिराज्य गाजवण्याचा.
एक क्षण बळीराजाच्या डोळ्यातून बरसण्याचा
उभ्या पिकांचे तरारलेपण ओंजळीत अनुभवण्याचा
सुखांच्या क्षणांना आनंदाश्रूत भिजवण्याचा
ऋतू हिरवा ऋतू बरवा तो ढगाळलेल्या क्षणातून ओसंडणाऱ्या आनंदाचा.
