प्रित भोवळ.
प्रित भोवळ.
1 min
2.9K
निसटला एक क्षण
कथा तयाची झाली
प्रेमा तुझ्याच दारी
व्यथा स्वप्नांची आली!
नदी खळखळणारी
सागराची कविता, मूक झाली
उगाच त्या कड्याला
चांदण भोवळ आली!
तार झंकार प्रितीचा
वेणु सुरांच्या गाली
काळजातली सतार
प्रीत अमृत प्याली
