भाव खुळ्या मनाचे
भाव खुळ्या मनाचे
1 min
2.9K
पहाटवारा स्पर्शून जाता, कोमल माझ्या देहास,
उमलून येई ओठपाकळी, जाणवून तुझा भास.
वाऱ्यावरती सळसळल्या, खुल्या बटा केसांच्या,
शहारून काया जाहल्या, तेज श्रृंखला श्वासांच्या.
परसातला पारीजात बेभान होऊन धरेवर बरसला
जणु तुझे नी माझे मीलन पाहण्या तो तरसला
भास तू असल्याचे अजून किती रे मला छळणार,
भाव या खुळ्या मनाचे सांग कधी तुला कळणार?
