प्रेमात पडशील माझ्या...
प्रेमात पडशील माझ्या...

1 min

12.3K
हे माझे असणे हे दिसणे,
खरे नाही आहे सारे...
बघत जाऊ नकोस माझ्याकडे,
प्रेमात पडशील माझ्या...
प्रेमळ शब्दफुले गुंफता सारी,
धागा धागा मोहरुन जातो...
मोहरल्या धाग्यात गुंतू नकोस,
प्रेमात पडशील माझ्या...
शब्दांना गोंजारायला आवडते मला,
तू फसू नकोस त्यात...
अडकशील प्रेमळ शब्दांच्या जाळ्यात,
आणि प्रेमात पडशील माझ्या...
शब्दांतून ओथंबणाऱ्या भावना,
काल्पनिक आहेत साऱ्या...
प्रेमात पडून वाहू नकोस त्यात,
हाती काहीच लागणार नाही...