Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Hasari Pahat

Others

5.0  

Hasari Pahat

Others

प्रेमाचा प्रवास

प्रेमाचा प्रवास

1 min
108


प्रेमाच्या जाता गावी

शब्दही होती निनावी

तो तिच्या आणि ती त्याच्या 

डोळयांत स्वप्नं पाहतात भावी ।।१।।


प्रेमाच्या अनेक वाटा

तिथं शब्दही पडतो थिटा

तो तिच्या आणि ती त्याच्या 

मनात करतात आठवणींचा मोहक साठा           ।।२।।


प्रेमीक भेटींच्या अनेक जागा

तेव्हा शब्दही असतात निशब्द

तो तिच्या नि ती त्याच्या 

हातात हात घालून

जपतात प्रेमाचा नाजूक धागा ।।३।।


प्रेमात होतात प्रेमीयुगल वेडी 

विसरुन समाजाची अभेद्य बेडी

तो तिच्या आणि ती त्याच्या 

श्वासांत करतात 

स्पर्शांची लाडीगोडी       ।।४।।


प्रेमाचे कळते जेव्हा खरे रुप 

निशब्द भावनांनी घेतला जातो ऐकमेंकांचा निरोप

तो तिच्या आणि ती त्याच्या 

पाठमोर्‍या आकृतीकडे

पाहतच करतात 

अश्रुंनी प्रेमाचा समारोप    ।।५।।


Rate this content
Log in