Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Hasari Pahat

Others

3  

Hasari Pahat

Others

महिला दिन

महिला दिन

1 min
495


८ मार्च जागतिक महिला दिन

अखंड स्त्री शक्तिचा सन्मान 

उलटता इतिहासाचे पान

हरपते सर्वांचे देहभान  

स्त्रिया आहेतच खर्‍या पराक्रमी

त्यांच्यात नाही कशाचीच कमी

पराक्रमी झाशीची राणी 

इंग्रजांना पाजले तिने पाणी 

देशासाठी त्यागिले प्राण 

आज करुया तिचा सन्मान॥१॥


माता जिजाऊ खर्‍या लढाऊ 

घडवूनी शिवराया 

उभारला स्वराज्याचा महामेरू 

शिवरायांचे करुन संगोपन 

स्वराज्याचे केले जतन 

अशा लढाऊंचा आज 

खरा सन्मान॥२॥


सावित्रीबाई फुले खर्‍या ज्ञानज्योती

शिक्षणाची घेऊन मशाल हाती

घडवली शैक्षणिक क्रांती 

स्त्रियांसाठी उघडून 

शिक्षणाचे महाद्वार 

स्त्रियांमध्ये जागवला स्वाभिमान 

अशा तेजस्वी स्त्रिचा आज खरा सन्मान ।।३।।


इंदिरा गांधी खर्‍या पराक्रमी 

राजकारणातील पुरुष , मिरवत ही बिरुदावली 

राजकारणात केली किमया नामी

अखेर देशाच्या आल्या कामी

देशाच्या पहिल्या पंतप्रधान 

चला करुया त्यांचा सन्मान ॥४॥


देशासाठी लढली अनेक स्त्री रत्ने 

समाजमनाचे जिंकून मन

घडवले स्वत:च्या इतिहासाचे पान

चला करुया अखंड स्त्री 

शक्तिचा सन्मान ॥५॥


Rate this content
Log in