प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे
1 min
253
माझी बुद्धी मला सांगते
या जगात प्रेम वगैरे असं काही नसतं
जे काही असतं ते फक्त आकर्षण असतं
एका देहाबद्दल दुसऱ्या देहाला वाटणारं
माझं हृदय मला सांगते
प्रेम ही अशी भावना आहे की ती फक्त असते
ती व्यक्त करता येत नाही व्यक्त होतही नाही
तीच फक्त वाटणं असतं अथवा वाटून घेणं
माझं मन मला सांगत
या जगात फक्त आणि फक्त प्रेमच असतं
हे सारं जग फक्त प्रेमासाठी चाललं आहे
प्रेम म्हणजे मिळवणे नव्हे तर फक्त देणं
