STORYMIRROR

Khushbu magar

Others

3  

Khushbu magar

Others

पाऊसधारा

पाऊसधारा

1 min
192

सरीवर सरी मेघ रडी,

काळोख्याच्या आभाळी अश्रु गाळी,

गगन कडकडाट ओरडली,

मेघ श्रावण्या ओलेचिंब करी,

या पाऊसधारा माझ्या अंगणी येई||ध्||


हा चमचमाक विजेचा,

लख्य असा प्रकाश पडी,

गाई गुरे गोठ्यात पळी,

सगळीकडे ओलेचिंब होई,

या पाऊसधारा माझ्या अंगणी येई||१||


डोकावूनी पाही रोपटे,

पाने फुले बहरूनी चोहीकडे,

सगळीकडे हिरवे रान होई,

पक्षी किलबिलाट करूनी श्रावण गाणी गाई,

या पाऊसधारा माझ्या अंगणी येई||२||


मनचिंब होई हे निसर्ग पाहुनी,

डोळे भरूनी दृश्य पाहतच राही,

मन हे खुलूनी आनंदाचा वर्षाव होई,

सगळीकडे पावसाचे तळे वाही,

या पाऊसधारा माझ्या अंगणी येई||३||


Rate this content
Log in