पाखरू
पाखरू


तुमच्या पदरी पडले अन् हसत रडणे विसरले
तुमच्या कुशीत येताच कसे त्याचे मुख फुलले
उमगला त्याला स्पर्श तुमचा
जसे तुमचे शब्द त्याच्या कानी पडले
ओळखले त्या पाखराने तुम्हास अन्
स्वतःस भाग्यवान समजून आपले सर्वस्व तुम्हास अर्पणिले
होता तो फक्त निरागस जीव एक
लिंगात, धर्मात, जातीत त्यास तुम्ही बांधिले
काहुनी का पण ना सोडली त्याने ती निरागसता
त्या जाळ्यात तसेच फडफडत राहिले
कधी त्याने मुलगी म्हणून स्वतःस बांधले
कधी बहीण म्हणून स्वार्थास त्यागिले
कधी पत्नी म्हणून आपले घर सोड
िले
तर कधी सून म्हणून आपले स्वप्न
तर कधी आई म्हणून आपले अस्तित्वच त्यागिले
म्हणून का कधी गगनातील उंच भरारी ते विसरले?
बनवले त्या पाखराने तुम्हास आपले कर्जदार
पण तुम्हास हे का कधी उमगले?
आज ते पाखरू असे हिरमुसले
की ना बळ त्याच्या पंखात ना इच्छाशक्तीत राहिले
आयुष्यभर गगनास फक्त नजरेत भरत राहिले
अश्रूंनी त्याचे मन भिजूनही बाकी अधरी मात्र हास्य खुलवत राहिले
आणि
आज घेतली उंच भरारी त्या पाखराने
ना मागे बघण्यासाठी ना कधी परतण्यासाठी
म्हणून का तुमचे डोळे कधी पाणावले?