पाखरू
पाखरू
1 min
415
आपल्या तालात उडत होती
हवेत मोकळ्या फिरत होती
पंख छाटणारे मिळाले सोबती
तरीही आकाशात भिरभिर फिरती
घास चोचीत ठेवती
पिल्लांना दाणा आणत होती
वाटेत चोर टिपत होती
तरीही पोटासाठी घास आणत होती
वादळात घरटे उडती
पुन्हा घरटे ती जोडत होती
आयुष्यात संकट येत होती
तरीही ती खचत नव्हती
उंच भरारी झेप घेती
गोळख्यात सापडले सोबती
गुंतले तिच्या शर्यतीत
तरीही ती पहिली होती
