ओढ पावसाची
ओढ पावसाची


एकसारखे भिजत चाललोय आपण
तरीसुद्धा तुझा पाऊस वेगळा...
माझा वेगळा...
तुझा पाऊस निळ्या धारा घेऊन येतो...
माझा फक्त खारट वारा घेऊन येतो...
तुझा पाऊस उचलून घेतो पाण्यातील
सरींना...
माझा पाऊस ओल देतो सुकून थकल्या स्टोरींना...
माझा पाऊस भेगा भेगात उतरून जातो...
तुझा पाऊस स्वप्नामागे रुजून राहतो...
माझा पाऊस विकून येतो मागली
ऊन साचलेली...
तुझा पाऊस कवितेसारखा
पहाटे पहाटे वसलेली...
तुझा पाऊस गरम भजी...
तुझा पाऊस लाँग ड्राइव्ह..
.
माझा पाऊस गळके छप्पर...
माझा पाऊस स्ट्रगल टू सर्व्हाय...
माझा पाऊस मोजत बसतो;
फुटपाथवरचे बिछाने...
तुझा पाऊस प्रश्न विचारतो...
हे इंद्रधनुष्य कशाला...
तुझा पाऊस कडेकपारे सर धरून येतो...
माझा पाऊस कुस पाऊस बदलताना
डोळे भरून येतो...
माझा पाऊस चिखल सगळा...
तुझा पाऊस श्वास...
तुझा पाऊस माझं असणं....
माझा फक्त भास…
तुझा पाऊस वेगळा...
माझा पाऊस वेगळा...
तरीसुद्धा एकसारखेच
भिजत चाललोय... आपण...!!!!