नवसृजन (कविता)
नवसृजन (कविता)
1 min
243
मृदगंधातून अत्तर शिपिंता
भुईवर मयुर पिसारा फुले
अलवार झुळुक स्पर्शता
धरतीवर सहस्रधारा खुले !!1!!
बहरली पर्णिका रानीवनी
अमृतधारा ने कुभं सजले
नवचैतन्य बळीराजा मनी
अवनीवर अंकुर उमलले !!2!!
कोवळे तुषारांचे पडे कवडसे
सप्तरंगी इंद्रधनु नभी उमटले
वसुधंरा मखमलीने शोभतसे
कृष्णमेघ जलधारांनी नटले !!3!!
नवसृजनाची ओढ चराचराला
नंदनवनाला हिरवाई चे कोंदण
मनभावन सोहळा तनामनाला
सरींने पुलकित धरेचे अंगण!!4!!
नवसंजीवन देई साज शृंगार लाजरा
अचंबित ते अवघ्या सृष्टीचे रेखाटन
पावसाचा थेंब करी चातक साजरा
अंकुरले बीज वसुधंरेला अलिंगन !!5!!
