नथीचा नखरा
नथीचा नखरा
नथीचा नखरा मिरवावा किती
श्रूगांराचा मेळ बसवावा किती
नथ मराठमोळा दागिना खास
सवाष्णीच्या लेण्याचा हाच श्वास
सजते जेव्हा कारभारीन
असतो तिचा वेगळाच थाट
तिच्या सौंदर्याच्या वर्णनाने
होता तुम्ही भुईसपाट
नखशिखांत तारूण्य शोभते
सजलेल्या या दागिन्यांनी
उठून दिसते सोनपरी ही
शोभिवंत या लेण्यांनी
