नातं तुझं माझं.
नातं तुझं माझं.
1 min
227
नातं तुझं माझं श्वास न उच्छवास जस
काळजात माझ्या तुझं प्रेम कोरलंय जस
तुझ्याविन जगणं नकोच मला
जीवनात माझ्या तू पाहिजेस तू प्रत्येक क्षणाला.
तुझं माझं भांडण कितीदातरी होत
वेड मन माझं तुझ्यासाठी माघारच घेत
तू रुसतोस कधी कधी मीही रुसते
गोड तुझं रूप पाहून मन माझं हे हसते.
स्वप्न माझे तुझ्याशी एकरूप झाले
कधी हाती फुले कधी काटेही आले
सुखदुःख सारे सहनही केले
तुझ्यामुळे त्याचे काहीच नाही वाटले.
