नातेसंबंध
नातेसंबंध
1 min
213
जुळे शब्दांनी
गुंफण मायेची
प्रेमळ छायेची
भरे गंधांनी....१
वीण गहिरी
रेशमी बंधाची
विविध रंगाची
दिसे साजिरी....२
जपू या नाती
सजवू जीवन
सांधू यात मन
घेऊन हाती....३
शब्दांनी वाढे
नात्याची दृढता
विचार सरता
वादंग काढे....४
नातेसंबंध
असेच वाढावे
प्रेमाने जपावे
नात्याचे बंध...५
