नाळ
नाळ
1 min
9.5K
तुझ्या नसांनसातून..
ती संवेदनशील नस पकडून
द्यायचाय अग्निडाग...
आणि पेटवायचंय
पूर्ण शरीर...
ज्यात वाहतात धर्म, जात, वर्ण, लिंग
लाल रक्त होऊन...
डोळे बंद कर..
आणि अक्कल गहाण ठेव..
होऊ दे नागड्या नजरा..
फोडू दे टाहो...
गाजव मर्दुमकी..
रक्ताच्या अभिषेकाने शांत होईल दाह...!?
अग्निडागासोबत मीही पेटलेय..
एकदा बघ ...
आणि ऐक...
सगळी पेटलेली शरीरं...
कल्लोळ, टाहो, हंबरडा, रडणं, ओरडणं, ओरबाडणं,
कर्कश्य आवाज, किंचाळ्या...
आता राहिलीय फक्त राख..
घे त्यातून वेचून ..
तुझं रक्त, जात, धर्म जे काही होत तुझं...??
आणि बघ जोडून 'नाळ'
माणुसकीशी...
जमतंय...?
