मराठी दिनानिमित्य
मराठी दिनानिमित्य
1 min
14.5K
मराठी दिनानिमित्य
करूया एक पण |
मराठी भाषेला ठेऊ जपुन ||
रामरक्षा म्हणूया,
म्हणु मनाचे श्र्लोक |
पाच ते पंचवीस चे पाढे म्हणु चोख ||
वाचूया मराठी,
स्वामी आणि राधेय |
श्रीमंन योगिनी
सारखे ध्येय ||
मराठी जेवुया,
पौष्टिकआणि रुचकर |
चुलीवरची भाकर आणि
देवून मनोसोक्त ढेकर||
मराठी गाण्याच्या भेंड्या खेळु चला |
लावणी ,भजन अन भावगीतांचा मेळा ||
साजरा करू भोंडला , दसरा अन दिवाळी |
पाडवा, गणपती आणी पारंपरिक होळी ||
विसरून कसे चालेल झीम्मा आणी फुगडी |
मराठमोळे अलंकार सोबतीला बुगडी ||
मराठी माणसा जपरे आपली मराठी |
मात्रुभाषेचा गोडवा कायम राहूदे ओठी ||
तूच जर विसरलास, आपल्या मायबोलीची महती |
वंचित राहील भाषेतल्या
ओल्याव्यास पुढील पीढ़ी ती ||
