मोबाईल अन सूरपारंबी
मोबाईल अन सूरपारंबी
1 min
599
मोबाईल ने केला,
मुलांचा उध्वस्त वेळ।
आता कोणीही नाही,
खेळत सूरपारंब्या चा खेळ॥१॥
आज-काल पालकांना,
मोबाईलचा लागत नाही मेळ।
आतापर्यंत मोबाईलवर कधीच,
आला नाही सुर पारंबी चा खेळ॥२॥
आता मोबाईल मध्ये,
आहे सगळे गेम।
पण आता गोटया खेळात,
कोणालाच नाही नेम॥३॥
मोबाईल ने पोराला,
अडकवलं त्याच्या जाळ्यात।
आता पोर जात नाही,
सूरपारंब्या खेळायला त्या मळ्यात॥४॥
मोबाईल ने प्रत्येकाला,
केलाय वेड।
कोणालाही माहीत,
नाही जुनं खेड॥५॥
आज कालच्या पिढीला,
मोबाईल आहे खास।
मोबाईल ने केलं,
प्रत्येकाचं जीवन –हास॥६॥
